मजूर महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

मजूर महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

राज्यातून मोलमजरी करण्यासाठी नगर शहरात आलेल्या मजूर महिलेवर ठेकेदाराने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या महिलेच्या फिर्यादीवरून ठेकेदार आरोपी बबन जालिंदर चव्हाण यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परराज्यातील एक दांम्पत्य मोलमुजरीसाठी नगर शहरात राहत आहे. दोघेही मजुरीचे काम करतात. ठेकेदार बबन चव्हाण (रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) याने परप्रांतिय महिलेला शुक्रवारी (दि.2) दुपारी दीड वाजता भिस्तबाग महाल भाग येथील बांधकाम सुरू असलेल्या एका घरी बोलविले.

याठिकाणी महिलेला बांधकाम कामासाठी लागणारी कच घेऊन घरात बोलविले. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. या महिलेने घराचा दरवाजा उघडून घराबाहेर पळ काढून स्वतःचा बचाव केला. घरी आल्यानंतर तिनेही घटना पतीला सांगितली. त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने दिलेले फिर्यादीवरून ठेकेदार बबन चव्हाण याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com