लेबर कॉन्ट्रॅक्टरला 39 लाखांचा गंडा

कोतवाली पोलिसांत गुन्हा
लेबर कॉन्ट्रॅक्टरला 39 लाखांचा गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

छावणी परिषदेकडून पथकर टेंडरकामाचे 39 लाख रूपये बँक खात्यावर स्वीकारून ते परत न करता त्या रकमेचा अपहार करत फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्ट्रॅक्टर अजय सुगंध शिंदे (वय 36 रा. कायनेटीक चौक) यांनी फिर्याद दिली आहे.

लेबर कॉन्ट्रॅक्टरला 39 लाखांचा गंडा
दूधगंगा पतसंस्था सोमवारपासून पुन्हा सुरु होणार

जीएमआर टोलवेजचे अरविंद गरड (रा. सोलापूर) व मे. एन. एच. इंजिनिअर्सचे (पिलानी, राजस्थान) अजनेशकुमार महेंद्रकुमार जांगीर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शिंदे हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. अचल एंटरप्राईजेस नावाची त्यांची फर्म आहे. नगर शहरामध्ये छावणी परिषदेकडून पथकर नाका चालविण्यासाठी त्यांना टेंडर घ्यायचे होते. परंतु छावणी परिषद सदरचे टेंडर रजिस्टर असलेल्या व टोलनाक्यासंबधी अनुभव असलेल्या कंपनीलाच देते. त्यांनी त्यांच्या ओळखीचे अरविंद गरड यांना पथकर नाक्याचे टेंडर घेण्यासाठी भागीदार कंपनीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याने आपण सर्व मिळून भागीदारीमध्ये काम करू, असे सांगितले. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये मार्केटयार्ड येथे अरविंद याने मे. एन. एच. इंजिनिअर्सचे जांगीर तुमच्या सोबत भागीदारी करण्यास तयार असल्याचे सांगितले.

लेबर कॉन्ट्रॅक्टरला 39 लाखांचा गंडा
पुतण्याचे चुलत्यावर ब्लेडने वार

टेंडर घेण्यासाठी छावणी परिषदेकडे भरणा करावयाची परतावा डिपॉझिट रक्कम 30 लाख रूपये व फर्म फी 28 हजार रूपये शिंदे यांनी एन. एच. इंजिनिअर्स या कंपनीच्या नावाने भरायची व भागीदार व्यवसायासाठी लागणारी बँक गँरटी व आवश्यक कागदपत्रे एन. एच. इंजिनिअर्स यांनी छावणी परिषदेला सादर करायचे. टेंडर संपल्यानंतर अनामत रक्कम 30 लाख रूपये शिंदे यांना परत करायची, असे अजनेशकुमार जांगीर यांचेशी बालणे करून दिले होते. त्यासंबधी करारनामा करण्याचे ठरले होते.

लेबर कॉन्ट्रॅक्टरला 39 लाखांचा गंडा
वाहनांच्या बॅटर्‍यांची चोरी करताना एकाला पकडले

त्यानंतर अरविंद गरड व जांगीर यांच्या सांगण्यावरून टेंडरसाठी शिंदे यांनी 15 सप्टेंबर 2020 रोजी छावणी परीषद यांच्या बँक खात्यात एम. एच. इंजिनिअर्स या कंपनीस टेंडर मिळण्यासाठी अंचल एंटरप्राईजेसच्या खात्यावरून 30 लाख रूपये आरटीजीएसद्वारे भरणा केले. तसेच फर्म शुल्क 28 हजार भरलेले आहे. अजनेशकुमार जांगीर यांनी बँक गँरंटीसाठी नऊ लाख रूपये कमी पडत असून मी ते तुम्हाला परत करेल, असे सांगितल्याने मे. एम. एच. इंजिनिअर्स या कंपनीच्या खात्यात नऊ लाख रूपये 31 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यानंतर छावणी परीषदकडून भागीदार कंपनी मे. एन. एच. इंजिनिअर्स कंपनीला टेंडर मिळाले.

शिंदे यांनी अरविंद गरड व मे. एन. एच. इंजिनिअर्स यांना सांगितल्याने कंपनीच्या वतीने 15 एप्रिल 2021 रोजी छावणी परीषदेला पत्रव्यवहार करून पथकर नाक्याबाबतचे टेंडर कोणतीही थकबाकी न ठेवता खंडीत केले. त्यानंतर भागीदार कंपनीच्या वतीने शिंदे यांच्याकडून छावणी परीषद यांना केलेली अनामत रक्कम 30 लाख मागितली असता छावणी परीषदने ती रक्कम मे. एन. एच. इंजिनिअर्स यांच्या खात्यात 9 जुलै 2021 रोजी परत केली असल्याचे सांगितले. सदर एकूण 39 लाख रुपये परत देणेबाबत शिंदे यांनी स्वतः व अरविंद गरड यांच्यामार्फत अनेशकुमार जांगीर यांना सांगितले. मात्र, ते रक्कम परत करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याची फिर्याद शिंदे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com