लेबर कॉन्ट्रॅक्टरला लोखंडी रॉडने मारहाण

एमआयडीसीतील घटना || तिघांवर गुन्हा
लेबर कॉन्ट्रॅक्टरला लोखंडी रॉडने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कंपनीत घेतलेले लेबर कॉन्ट्रक्ट काढून घेण्यासाठी तिघांनी लेबर कॉन्ट्रक्टरला लोखंडी रॉडने मारहाण केली. आर्यन आदिनाथ गिरमे (वय 27 रा. ताठेमळा, भुतकरवाडी, सावेडी) असे मारहाण झालेल्या लेबर कॉन्ट्रक्टरचे नाव आहे. नागापूर एमआयडीसीतील जी.के.एन. कंपनीत रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.

जखमी गिरमे यांनी रविवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश नरेश शेळके, ऋषिकेश कदम, विशाल काटे (सर्व रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. आर्यन गिरमे यांनी नागापूर एमआयडीसीतील जी.के.एन कंपनीत लेबर कॉन्ट्रक्ट घेतले आहे.

रविवारी दुपारी आर्यन कंपनीच्या गेटवर असताना तेथे यश, ऋषिकेश व विशाल हे तिघे आले. त्यांनी,‘लेबर कॉन्ट्रक्ट काढुन घे, नाहीतर तुला महागात पडेल,’ असे म्हणून आर्यन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. यश नरेश शेळके याने लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आर्यन गिरमे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com