या तालुक्यात गुटख्यासह 24 लाखाचा मुद्देमाल जप्त

9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या तालुक्यात गुटख्यासह 24 लाखाचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

घारगाव पोलिसांनी (Ghargav Police) पठार भागातील कुरकुटवाडी येथे मोठी कारवाई करत लाखो रुपयांच्या गुटख्यासह (Gutkha) तब्बल 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. ही कारवाई मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीला बंदी (Gutkha Sale Ban) असतानाही पठार भागातील कुरकुटवाडी येथे गुटख्याची विक्री होत होती. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केले असता काहीजण विक्री (Sales) करण्याच्या तयारीत होते.

या तालुक्यात गुटख्यासह 24 लाखाचा मुद्देमाल जप्त
निळवंडेही भरले; मुळातील वाचा पाणीसाठा !

कुरकुटवाडी (Kurkutwadi) परिसरातील कोटमारा धरणाच्या कडेला रस्त्यावर काहीजण बेकायदेशीर रित्या गुटख्याची विक्री करण्याच्या तयारीत होते. पोलिसांना या ठिकाणी महिंद्रा कंपनीची पांढर्‍या रंगाची पिकअप गाडी नंबर एम. एच. 10 सी. आर. 9762, सुझुकी कंपनीची पांढरे रंगाची ईको गाडी क्रमांक एम. एच. 01 डी. ई. 7966 ही दोन वाहने आढळून आली. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून 6 लाख रुपये किमतीच्या हिरा पानमसाल्याचे एकुण 40 गोण्या जप्त (Seized) केल्या. याशिवाय विविध कंपन्यांच्या गुटख्यासह दहा लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी जप्त केली.

या तालुक्यात गुटख्यासह 24 लाखाचा मुद्देमाल जप्त
Asian Games 2023 : नगरच्या डिवायएसपी भोसलेंच्या कन्येने मिळविले सुवर्णपदक

याशिवाय दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या हिरा पानमसाल्याचे एकुण 14 गोण्या, प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखुच्या एकुण 7 गोण्या, 5 लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची ईको गाडी, 50 हजार रुपये किमतीचे सिंफनी कंपनीचे 6 कुलर, अविनाश कमलाकर यांच्याकडे 2 हजार रोख रक्कम, संदीप शिंगवान यांचेकडे 8 हजार रुपये रोख रक्कम, सागर नाईकवाडीकडे 3 हजार रुपये रोख, 4 मोबाईल असा एकूण 24 लाख 29 हजार 994 रुपयांचा ऐवज जप्त केला.

या तालुक्यात गुटख्यासह 24 लाखाचा मुद्देमाल जप्त
तुमच्या धमक्यांना मी भित नाही; महसूलमंत्री विखे पाटलांचा थोरातांना इशारा

याबाबत पोलीस नाईक संतोष खैरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अविनाश आण्णा कमलाकर, पिकअप चालक प्रमोद सदाशिव मोरे (दोघे राहणार रुई, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर), ईको गाडी चालक संदीप गोरक्षनाथ शिंगवान (रा. धामणगांव, ता. अकोले), सागर रमेश नाईकवाडे (रा. धामणगांव, ता. अकोले), संदीप शिवाजी वाळुंज (रा. धामणगांव), प्रकाश आनंदराव पाटील (रा. कोल्हापुर नाका, इचलकरंजी), शुभम चेंडके (रा. शिवणकवाडी, ता. शिराळ, जि. कोल्हापुर), सनि उर्फ सनिल रमेश नाईकवाडे (रा. धामणगांव, ता. अकोले), पिकअप गाडी नंबर एम. एच. 10 सी. आर. 9762 चा मालक या नऊ जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 482/2023 भारतीय दंड संहिता कलम 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहे.

या तालुक्यात गुटख्यासह 24 लाखाचा मुद्देमाल जप्त
संगमनेर, राहुरी परिसरात पिकअप व भंगार चोरी करणारे 5 आरोपी जेरबंद

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथे ही कारवाई अहमदनगर येथील एलसीबीच्या पथकाने (LCB Team) केली आहे. याप्रकरणी ‘अर्थ’पूर्ण तडजोड झाल्याची चर्चा आहे. ही कारवाई आळेफाटा येथे करण्यात आली मात्र ही कारवाई संगमनेर तालुक्यात करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. यामुळे ही कारवाई संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

या तालुक्यात गुटख्यासह 24 लाखाचा मुद्देमाल जप्त
जेव्हा सकाळी 9 वाजता पगार जमा झाल्याचा मेसेज येतो...!
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com