सराईत गुन्हेगार कुर्‍हाडे टोळीवर मोक्का

एमआयडीसीत टाकला होता दरोडा || नऊ आरोपींचा समावेश
सराईत गुन्हेगार कुर्‍हाडे टोळीवर मोक्का

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी परिसरात दरोडे (Robbery in MIDC Area), रस्ता लूट आणि चोर्‍या (Road Robbery and Burglary) करणार्‍या आरोपी सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे (वय 33 मूळ रा. चितळी ता. राहाता, हल्ली रा. वडगाव गुप्ता ता. नगर) याच्या टोळीतील नऊ आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Organized Crime Prevention Act) (मोक्का) (Mokka) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर (Nashik Sub-Inspector of Police Dr. B. G. Shekhar) यांनी मंजुरी दिली आहे.

एमआयडीसीतील ब्लॉक नंबर एल -26 मधील झेन इलेक्ट्रीक प्रा. लि. कंपनीवर 22 ऑक्टोंबर 2021 रोजी आरोपी गणेश कुर्‍हाडे याच्या टोळीने दरोडा (Robbery) टाकला होता. या गुन्ह्यात मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी राहुल सुरेश जाधव (वय 21 प्रवरासंगम ता. नेवासा), पंकज बापू गायकवाड (वय 27 रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर), आकाश रामचंद्र भोकरे (वय 23 रा. कायगाव टोका ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), सागर गोरख मांजरे (रा. श्रीरामपूर), सतीश मच्छिंद्र शिंदे (गणेश चौक, बोल्हेगाव), अमोल सटवा कापसे (रा. कॉटेज कॉर्नर, अहमदनगर), विक्की उर्फ विकास शिंदे (रा. श्रीरामपूर), विकास अशोक जाधव (रा. पाखोरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) या टोळीतील सदस्यांचा मोक्कामध्ये समावेश आहे.

या टोळीने एमआयडीसी (MIDC), कोपरगाव (Kopargav), श्रीरामपूर (Shrirampur), लोणी (Loni), तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Topkhana Police Station) हद्दीत चोर्‍या, रस्ता लूट, दरोडे टाकले आहेत. औरंगाबाद (Aurangabad), नाशिक (Nashik) या जिल्ह्यातही गुन्हे केलेले आहेत. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (Deputy Superintendent of Police Ajit Patil) (नगर ग्रामीण) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com