कुंभमेळ्यावरून आलेल्यांचा शोध घेण्याची मागणी

कुंभमेळ्यावरून आलेल्यांचा शोध घेण्याची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये हरिद्वार येथे घेण्यात आलेल्या कुंभमेळाव्यात लाखोंच्या संख्येने जमलेले भाविक हे अनेक राज्यांतून आले होते,

ते दर्शन घेऊन आपआपल्या घरी येत असून महाराष्ट्रमध्ये हरिद्वार येथून येणार्‍या भाविकांना 14 दिवसांसाठी अलगीकरण कक्षामध्ये ठेवावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाअध्यक्ष अजीम राजे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. महानगरपालिकेने कुंभमेळा येथून येणार्‍या भाविकांचा शोध घेण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. त्या सर्वांची करोना तपासणी करून त्यांना अलगीकरण कक्षामध्ये 14 दिवस ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com