कुंभारीत शेतकरी, विद्यार्थी तुडवतात दररोज चिखल

कुंभारीत शेतकरी, विद्यार्थी तुडवतात दररोज चिखल

कुंभारी |वार्ताहर| Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील 5 नंबर रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून दूध उत्पादक, शेतकरी, विद्यार्थी यांना दररोज 2 किलोमीटर पायी चिखल तुडवत या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. आजारी माणसाला दवाखान्यात न्यायचे ठरल्यास येथील ग्रामस्थांनी काय करावे, असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यासाठी हजारो कोटींचा निधी आणल्याच्या वल्गना होत आहेत.

मात्र वाड्या-वस्त्यांवर जाणार्‍या रस्त्यांची परिस्थिती पाहिल्यास ही कोटीची उड्डाणे कुठे विरली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या रस्त्याबाबत आ. आशुतोष काळे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. कुंभारी कोळपेवाडी येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. शेतकर्‍यांना मका, सोयाबीन तसेच शेतमाल बाजारात नेताना अडचण होते. जर इथे कोणी आजारी पडले तर अ‍ॅम्ब्युलन्स सुद्धा येथे पोहोचू शकत नाही, अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्याची स्वतः पाहणी करावी, अशी मागणी येथील पंढरीनाथ घुले, सतीश घुले, संजय घुले, रमेश कदम, रमण कदम, भीमराज घुले, निवृत्ती घुले, अनिल घुले, अभी घुले आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com