कुळधरणला उसात बिबट्याचे दर्शन

कुळधरणला उसात बिबट्याचे दर्शन

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कुळधरण येथील पांडवडगर तलावानजीक उसाच्या शेतात शनिवारी बिबट्या आढळून आला. दुपारी 3 वाजेच्या सुमारास ऊस तोड सुरू असताना मजूर तसेच शेत मालकाला बिबट्या दिसला. तोड राहिलेला काही ऊस शेतकर्‍याने पेटवून दिला. त्यानंतर बिबट्याने शेजारच्या उसात धूम ठोकली.

शेतमालक आजिनाथ दादासाहेब गिरगुणे यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी याच परिसरातून दत्तू धोंडीबा गिरगुणे यांची मेंढी फस्त केल्याचे गिरगुणे म्हणाले. त्यामुळे कुळधरण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com