कुळधरण परिसराज जोरदार पाऊस ; वाहतूक बंद

कुळधरण परिसराज जोरदार पाऊस ; वाहतूक बंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कुळधरण, बहिरोबावाडी यासह विविध भागांमध्ये काल रविवारी (दि.11) दुपारी जोरदार पाऊस पडला. कुळधरण परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राशीन कुळधरण जाणारा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे त्या परिसरातील वाहतूक बंद पडली होती. या ठिकाणी नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

कर्जत तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. प्रारंभी या पावसाने खरिप पिकांना जीवदान मिळाले परंतु आता अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने या पावसाने खरीप पिके पाण्यात गेली आहेत. बाजरी, मका, तूर, कपाशी यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.

अनेक शेतकर्‍यांच्या कांद्याच्या चाळी भिजल्याने त्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे लालासाहेब सुद्रिक, अशोक जगताप यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com