कुक्कडवेढे सोसायटी निवडणुकीत 32 वर्षांनंतर बिनविरोधची परंपरा होणार खंडित

कुक्कडवेढे सोसायटी निवडणुकीत 32 वर्षांनंतर बिनविरोधची परंपरा होणार खंडित

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शिवशक्ती परिवर्तन मंडळ व भोलेनाथ मंडळामध्ये सरळसरळ लढत होणार आहे. तेरा जागांसाठी ही निवडणूक होत असून दि.17 मे रोजी मतदान होणार आहे. 486 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.

कुक्कडवेढे सोसायटीची निवडणूक 1984 साली झाली. तेव्हापासून आजतागायत राहुरी बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. केरू पानसरे यांनी गेल्या 38 वर्षांपासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध करून संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले. परंतु यावेळी निवडणुकीमध्ये सभासदांचा रोष व गावातील स्थानिक पुढार्‍यांनी सहभाग घेतल्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे. या निवडणुकीमध्ये शिवशक्ती परिवर्तन मंडळाचे नेतृत्व जगन्नाथ चौधरी, बाळासाहेब तिडके, अमोल गव्हाणे, बंटी चोथे हे करीत आहेत. तर भोलेनाथ मंडळाचे नेतृत्व राहुरी बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. केरू पानसरे, पंकज चौधरी हे करीत आहेत.

गेल्या 32 वर्षांपासून पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची वेळ अनेक वर्षानंतर आल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसत आहे. अनेक तरुण या निवडणुकीमध्ये उतरले असून दोन्ही पार्ट्यांच्या गावपुढार्‍यांनी निवडणुकीची जोरात तयारी केली आहे. मतदारांनाही 32 वर्षांनंतर आपलं मतदान या सोसायटीमध्ये आहे, याची जाणीव निवडणुकीमुळे होत आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन होणार का? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.

शिवशक्ती परिवर्तन मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे, हरिभाऊ कल्हापुरे, भिका गव्हाणे, अरुण चोथे, अण्णासाहेब चौधरी, ललित चौधरी, राजेंद्र चौधरी, काशिनाथ वाघाडे, सविता पटारे, जनाबाई शिंदे, तुषार मकासरे, विकास गव्हाणे, बबन तारगे, भोलेनाथ मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे, जनाबाई कल्हापुरे, हौशाबापू गव्हाणे, दत्तात्रय ढेसले, केरु पानसरे, महेश पानसरे, रामभाऊ पानसरे, तुकाराम येवले, बाबासाहेब सोनवणे, बाईजाबाई नानेकर, लंका पानसरे, अरुण मकासरे, अर्चना पानसरे, शंकर शिंदे हे उमेदवार निवडणुकीमध्ये उतरले आहेत.

राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे कारखाना माजी संचालक राहुरी तालुक्यातील बाजार समितीचे विद्यमान संचालक अ‍ॅड. केरू पानसरे स्वतः व त्यांचा मुलगा हे दोघेही बापलेक या निवडणुकीमध्ये उभे आहेत. राहुरी तालुक्यातच नव्हे तर सर्व सभासदांमध्ये एक चर्चेचा विषय झाला आहे. राहुरी तालुक्यातील विविध पदे भुषविणारे अ‍ॅड. पानसरे हे स्वतः छोट्या सहकारी संस्थेची निवडणूक लढवत असल्यामुळे तालुका पातळीवर याची राजकीय चर्चा सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.