कुकाण्यात एलसीबीचा बिंगो जुगारावर छापा

87 हजारांचा मुद्देमाल जप्त; 12 जणांवर कारवाई
कुकाण्यात एलसीबीचा बिंगो जुगारावर छापा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांवर गुन्हा दाखल केला.या सर्वांकडून 87 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे हवालदार विजय वेठेकर पथकासह अवैध व्यवसायांवर कारवाई करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून कुकाणा येथे संगणकावर बिंगो जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाल्यावर कुकाणा गावामध्ये हॉटेल पारखच्या आडोशाला छापा घालण्यात आला. छाप्यात श्री. वेठेकर यांच्यासह ज्ञानेश्वर नामदेव शिंदे, कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढाकणे, राहुल भाउसाहेब सोळुंके, चालक हवालदार चंद्रकांत कुसळकर यांचा सहभाग होता.

त्यावेळी तिथे कॉम्प्युटरवर बिंगो नावाचा हारजितीचा जुगार खेळताना पुढील व्यक्ती दिसून आल्या. 1) भागवत गिनदेव बनवे वय-21 रा. आखारबाग पाथर्डी 2) लक्ष्मण बन मासाळकर वय 20 रा. नाथनगर पावडी 3) सचिन राम साळवे वय 20 रा.तेलकुडगाव ता. नेवासा, 4) संजय कुंडलिक घाडगे वय 32 रा. तेलकुडगाव ता. नेवासा 5) गणेश मोहन वावळे वय 26 रा.अंतरवली ता. नेवासा, 6) नामदेव रामभाउ सरोदे वय 31 रा. अंतरवली ता.नेवासा 7) स्वप्निल सुभाष गोर्डे वय 36 रा.कुकाणा ता. नेवासा, 8) विलास एकनाथ आहेर 31 रा.दहेगाव ता.शेवगाव 9) संकेत विष्णू गर्जे वय 19 वडुले ता. नेवासा 10) अशोक विठ्ठल चावरे वय-30 रा.दहेगावने, 11) मंदिर हरीभाऊ काळे वय 40 रा. तेलकुडगाव ता. नेवासा, 12) अंकुश उत्तम पुढे 2713) नितिन शिवाजी धोत्रे रा. विजयनगर पाथर्डी (फरार) हे बिंगो नावाच्या हारजितीचा जुगार खेळतांना व खेळवितांना 87 हजार 400 रुपयांच्या मुद्देमालसह मिळून आले.

या सर्वांवर पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांच्या फिर्यादीवरून सरकार तर्फे जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com