कुकाणा-कौठा रस्त्यासाठी बांधकाम विभाग कार्यालयासमोर घंटानादचा इशारा

कुकाणा-कौठा रस्त्यासाठी बांधकाम विभाग कार्यालयासमोर घंटानादचा इशारा

नेवासा |तालुका प्रतिनिधी | Newasa

पावसाळा सुरु झाला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग कुकाणा ते कोैठा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी हालचाल करत नसल्याने बांधकाम खात्याला जाग आणण्यासाठी नेवासा फाटा येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा कुकाणा परिसरातील नागरिक, विविध संघटना व प्रवासी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. तालुक्यातील कुकाणा, देवगाव, जेऊर हेैबती, तरवडी,फत्तेपूर, शहापूर, चिलेखनवाडीसह परिसरातील दहा गावांसाठी कुकाणा ते घोडेगाव मार्ग नगरला जाण्याकरता सोयीचा आहे. मात्र सद्य स्थितीत कुकाणा ते देवगाव व पुढे देवगाव ते फत्तेपुर-कौठा असा दहा किमीचा रस्ता पुर्णपणे उखडून पडला आहे.

या रस्यावर दुचाकी चालवणेही मुश्किलीचे झाले आहे. खराब रस्त्यामुळे कुकाणा परिसरातील नागरिकांना नेवासा फाटामार्गे 20 किलोमीटरचा अधिक प्रवास करुन नगर, सोनई, घोडेगाव, शनिदर्शनासाठी शनिशिंगणापूरला अधिक वेळ व इंधन खर्च जरुन जा-ये करावी लागत आहे. घोडेगाव ते चांदा व कोैठ्यापर्यंत रस्ता दुरुस्ती झाली पण पुढे कुकाण्याच्या दिशेने कौठ्यापासुन दुरुस्ती करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षभरापासुन हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.

परिसरातील सरपंच, यवक संघटना यांचेसह नेवासा प्रवाशी संघटनेचे नेते अनिल ताके, सुधीर चव्हाण, कुकाण्याचे सरपंच अमोल अभंग, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत, अंतरवालीचे सरपंच संदिप देशमुख, देवगावचे विष्णुदेव गायकवाड, जेऊरचे सरपंच महेश म्हस्के, सोैंदाळ्याचे शरद आरगडे, वडुलेचे सरपंच दिनकर गर्जे, तरवडीचे माजी सरपंच कारभारी तुपे आदींनी या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल संताप व्यक्त करुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com