‘या’ तारखेला सुटणार कुकडीचे उन्हाळी आवर्तन

शेतकर्‍यांना गरजेच्या वेळी मिळणार पाणी
File Photo
File Photo

कर्जत |वार्ताहार| Karjat

काही महिन्यांपूर्वी पुण्यात पाणी नियोजनाबाबत (Water Planning) कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) हे देखील उपस्थित होते. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी या बैठकीत मतदारसंघातील कुकडी प्रकल्पाचे आवर्तन (Kukadi Project Avartan) योग्य वेळेत आणि उच्च दाबाने सोडण्याबाबत तसेच उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये येणार्‍या शेतीला नदीतून पाणी मिळण्याबाबत मंत्र्यांसोबत चर्चा केली होती. त्यानुसार आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या प्रयत्नांना यश आले असून शेतकर्‍यांचा गरजेच्या वेळी कुकडीचे उन्हाळी आवर्तन येत्या 5 मार्चला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

File Photo
दोन शिक्षकांवर निलंबनाचा प्रस्ताव

कर्जत-जामखेड मतदारसंघातील (Karjat-Jamkhed Constituency) कर्जत तालुक्यातून कुकडी डावा कालवा (Kukadi Canal) जातो. त्याचा तालुक्यातील एकूण 54 गावांना शेतीसाठी उपयोग होतो. पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास ते जळून शेतकर्‍यांची अतोनात नुकसान होऊ शकते. सध्या या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यानुसार आता शेतकर्‍यांना या आवर्तनाचा गरजेच्या वेळी नक्कीच फायदा होणार आहे.

File Photo
महिलेला भररस्त्यात मारहाण पीआय गोकावे निलंबीत

आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी कुकडी बांधकाम वितरण विभाग कोळवडी येथे शेतकरी आणि अधिकार्‍यांच्या सोबत पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत शेतकर्‍यांनी केलेल्या मागणीनुसार तारखा निश्चित करून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी त्या तारखा मंत्री महोदयांकडे सादर केल्या होत्या.

File Photo
प्रशांत गडाख आरोपीच्या पिंजर्‍यात; कुटील राजकीय खेळ्यांची चर्चा

पाण्याचे योग्य नियोजन झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीस गावांना शेतीसाठी पाणी मिळाले तर हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकर्‍यांना त्याचा थेट फायदा होईल. यादृष्टीने आमदार रोहित पवार यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी हिताचा निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती बैठकीत केली होती त्यानुसार सकारात्मक निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

File Photo
महिलेचा विनयभंग करत कुर्‍हाडीने घाव घालून केले गंभीर जखमी

गेल्या वर्षी कमी पाणी असतानासुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न केला होता. यंदा पाणीसाठा चांगला असल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने यंदाचे नियोजन होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनीही व्यक्त केला होता. आता शेतकर्‍यांना कुकडीचे आवर्तन वेळेत मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

File Photo
ताफा थांबवून शरद पवारांकडून अपघातग्रस्तांची चौकशी
File Photo
विद्युत पंप चोर पोलिसांच्या ताब्यात
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com