कुकडी : डिंभेत 10000 दलघफूच्या पुढे साठा

वडजमध्ये 60 टक्के पाणीसाठा, येडगाव भरण्याच्या मार्गावर
कुकडी : डिंभेत 10000 दलघफूच्या पुढे साठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कुकडी प्रकल्पातील (Kukadi Dam) धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा (Water Storage) 50.52 टक्क्यांवर गेला आहे. काल सायंकाळी या समूह धरणातील पाणीसाठा 15000 दलघफू पुढे गेला होता.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या प्रकल्पात 699 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. गतवर्षी या प्रकल्पात केवळ 6764 दलघफू (22.79 टक्के) पाणी होते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक साठवण क्षमता डिंभे धरणाची (Dimbe Dam) 13 हजार 500 दलघफू आहे. गत 24 तासांत या धरणात 399 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने काल सकाळी 10037 दलघफू (72.33 टक्के) पाणीसाठा (Water Storage) झाला होता.

माणिकडोहमध्ये (Manikdoh) 4171 दलघफू पाणी आहे. चिल्हेवाडी छोटे धरण. त्यात 725 दलघफू (79 टक्के) पाणी झाल्याने काल पहाटे सांडव्यातून विसर्ग सोडण्यात येत आहे. पिंपळगाव जोगे धरणात मायनस साठा होता. तो आता साठा प्लसमध्ये आला असून 4.78 टक्के पाणीसाठा आहे. येडगाव धरणात 2118 (83 टक्के) पाणी आहे. वडजमध्ये 779 दलघफू (58 टक्के) पाणी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com