कुकडी प्रकल्पात 80 टक्के पाणी

कुकडी प्रकल्पात 80 टक्के पाणी
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा हळूहळू वाढत असून आता तो 23767 दलघफू (80 टक्के) झाला आहे. यापेक्षाही अधिक पाणीसाठा झाला असता पण लाभक्षेत्रातून पाण्याची मागणी वाढल्याने आवर्तन सोडण्यात आले होते. त्यात पाणी खर्च झालेले आहे.

7687 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव जोगे धरणात यंदा उणे साठा होता. हे धरण भरते की नाही अशी शंका घेतली जात असतानाच, आता याच धरणात 6916 दलघफू (64.17 टक्के) पाणीसाठा आहे. डिंभे, वडज दहा दिवसांपूर्वीच 100 टक्के भरलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com