कुकडीत 44 टक्के पाणीसाठा

डिंभे 63, माणिकडोह 32 टक्के भरले
कुकडीत 44 टक्के पाणीसाठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) श्रीगोंदा (Shrigonda), पारनेर (Parner) आणि कर्जत (Karjat) तालुक्यातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या (Kukadi Dam) पाणलोटात पाऊस सुरू असल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा (Water Storage) 12948 दलघफू (44 टक्के) झाला आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या प्रकल्पात 931 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने एकूण पाणीसाठा 12948 दलघफू (44 टक्के) झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात 7183 दलघफू (24 टक्के) पाणी होते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 18 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक साठवण क्षमता डिंभे धरणाची (Dimbhe Dam) 13 हजार 500 दलघफू आहे. गत 24 तासांत या धरणात 401 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने काल सकाळी 8896 दलघफू (63.17 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता.

तर एकूण पाणीसाठा 8510 दलघफू होता. पाण्याची आवक सुरूच असल्याने या धरणातील पाणीसाठा 63 टक्क्यांच्या पुढे सरकला होता. माणिकडोहमध्ये 3930 दलघफू पाणी आहे. चिल्हेवाडी छोटे धरण. त्यात 725 दलघफू (79टक्के) पाणी झाल्याने काल पहाटे सांडव्यातून विसर्ग सोडण्यात येत आहे. पिंपळगाव जोगे धरणात मायनस साठा होता. तो आता साठा प्लसमध्ये आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com