कुकडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट उपयुक्त पाणीसाठा

16 हजार 55 दलघफू पाणी : येडगाव 93, चिल्हेवाडी 78, डिंभेत 77 टक्के साठा
कुकडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट उपयुक्त पाणीसाठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कुकडी प्रकल्पातील पाणलोट (Watershed in the Kukadi project) क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत 31 जुलैअखेर जवळपास दुप्पट म्हणजेच 54.90 टक्के ऐवढा उपयुक्त पाणी साठा (Water Storage) आहे. गतवर्षी हा उपयुक्त पाणीसाठा 6 हजार 929 दलघफू (23.35 टक्के) तर यंदा तो 16 हजार 55 दलघफू (54.10 टक्के) ऐवढा आहे.

कुकडी प्रकल्पात (Kukadi Project) सध्या टक्केवारीच्या तुलनेत सर्वाधिक उपयुक्त पाणीसाठा हा येडगाव धरणात (Yedgav Dam) 93.38 टक्के, तर सर्वात कमी पाणीसाठा हा विसापूरमध्ये (Visapur) अवघा 7 टक्के आहे. कुकडी नदीवरील (Kukadi River) येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 246 मि.मी. पावसाची नोंद झालेली असून 2 हजार 315 दलघफू (93.38 टक्के) पाणी साठा आहे. 10 हजार 500 दलघफू क्षमता असणार्‍या माणिकडोह धरणात (Manikdoh Dam) सध्या 4 हजार 277 दलघफू (34.14 टक्के, पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाणलोटात आतापर्यंत 481 मि.मी. पाऊस झालेला आहे.

वडज धरणात (Vadaj Dam) सध्या 833 दलघफू (62.52 टक्के) पाणी आहे. घोड नदीवरील (Ghod River) डिंभे धरणात (Dimbhe Dam) काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. यामुळे धरणात 10 हजार 617 दलघफू पाणीसाठा (water Storage) असून त्याची टक्केवारी 77 टक्के आहे. पुष्पावती नदीवरील पिंपळगाव जोगा धरणात 4 तिार 732 दलघफू (8.2 टक्केच) पाणीसाठा आहे. विसापूर धरणाच्या (Visapur Dam) पाणलोटात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून आतापर्यंत 75 मि.मी. पाऊस झालेला आहे.

यामुळे धरणात 6.93 टक्के पाणीसाठा आहे. चिल्हेवाडी धरणाच्या पाणलोटात 132 पाऊस झालेला असून धरणात 78.50 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन दिवसांत कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोटात नग्ण पाऊस झालेला आहे. यात माणिकडोह 2 मि.मी., वडज 2 मि.मी., डिंबे 12 मि.मी., चिल्हेवाडी 6 मि.मी. अन्य ठिकाणी पावस गायब आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com