कुकडीत 80 टक्के साठा

24 तासांत 1072 दलघफू पाण्याची आवक, घोड निम्मे भरले
कुकडीत 80 टक्के साठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिरूरसह (Shirur) नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda), पारनेर (Parner) आणि कर्जत (Karjat) तालुक्यांतील शेतकर्‍यांचे जीवन अवलंबून असलेल्या कुकडी धरणांच्या (Kukadi Dam) पाणलोटात पाऊस झाल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत तब्बल 1072 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने कुकडी समूहातील एकूण पाणीसाठा (Water Storage) 23138 दलघफू (78 टक्के) झाला होता. त्यात वाढ होऊन सायंकाळपर्यंत साठा 80 टक्क्यांवर पोहचला होता.

या समुहातील सर्वात मोठे धरण डिंभे (Dimbhe), तसेच वडज (Vadaj) 100 टक्के भरलेले आहे. डिंभेत (Dimbhe) मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने सकाळी 10 हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यानंतर पावसाचा वेग मंदावल्याने हा विसर्ग कमी करण्यात आला.तो दुपारी 2500 क्युसेक होता.

पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा (Pimpalgav Joge Dam water Storage) 53 टक्क्यांवर गेला आहे. या धरणातील पाणीसाठा (water Storage) उणे होता. माणिकडोहमध्येही (Manikdoh) 57 टक्के पाणी आहे. येडगाव (Yedgav) 75 टक्के भरलेले आहे. याच काळात या समुहात केवळ 72 टक्के पाणी होते. डिंभेचा (Dimbhe) विसर्ग घोड धरणात (Ghod Dam) येत असल्यानेही या धरणाचा झपाट्याने साठा वाढत आहे. या धरणातील पाणीसाठा सकाळी 3204 दलघफू (43 टक्के) झाला होता. पाण्याची आवक वाढल्याने सायकाळी हे धरणही निम्मे भरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com