डिंभे, वडज कोणत्याक्षणी ओव्हरफ्लो

कुकडी प्रकल्पात 70 टक्के पाणीसाठा
डिंभे, वडज कोणत्याक्षणी ओव्हरफ्लो

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कुकडी (Kukadi) प्रकल्पाच्या पाणलोटात (Watershed) पावसाचा जोर वाढल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 646 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने या सर्व धरणांतील एकूण पाणीसाठा (water Storage) 20650 दलघफू (70 टक्के) झाला आहे.

डिंभे (Dimbhe) आणि वडज धरणांतील पाणीसाठा (Vadaj Dam Water Storage) 95 टक्क्यांवर गेल्याने पाऊस वाढल्यास कोणत्याहीक्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मीना आणि घोड नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असे प्रशासनाने कळविले आहे.

जुन्नर (Junnar) तालुक्यातील माणिकडोह (Manikdoh), वडज (Vadaj), पिंपळगाव जोगे (Pimpalgav Joge), येडगाव आणि आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण (Dimbhe Dam) अशी पाच धरणे मिळून कुकडी प्रकल्प (Kukadi Project) तयार झाला आहे. या प्रकल्पातील डिंभे धरणाची (Dimbhe Dam) साठवण क्षमता 13.50 टीएमसी आहे. कुकडी प्रकल्प आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना डिंभे धरण वरदान ठरले आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठे डिंभे धरण. यात 12800 दलघफू पाणीसाठा झाला आहे. 95 टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा (Water Storage) लक्षात घेता पाऊस वाढल्यास हे धरणातून रात्री कोणत्याही क्षणी विसर्ग सोडण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com