
श्रीगोंदा | Shrigonda
कुकडीच्या पाण्यासाठी (kukadi water) श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील शेतकरी (Farmer) वाट पाहत असताना.....
चार दिवसापासून सुरू झालेले आवर्तन (Kukadi Awaratan) देखील विस्कळीत असून पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. तालुक्यातील पूर्ण आवर्तन होईल का नाही हे अस्पष्ट असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
१३२ लिंक कालव्याला लाभार्थी पाणी टेलला आले नसल्याने आक्रमक झाले असून कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्या विरोधात घोषणा बाजी करत पाण्याची मागणी करत आहेत. पोलीस घटनास्थळी आले असून कार्यालयात समोर ठिय्या आंदोलन करत शेतकरी बसले आहेत.