कुकडीच्या आवर्तनातील अडथळा दूर

याचिका मागे
कुकडीच्या आवर्तनातील अडथळा दूर

श्रीगोंदा | Shrigonda

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला मात्र याबाबत आवर्तन सोडण्यापूर्वी मुंबई हायकोर्टात याचिका औटी यांनी दाखल केली होती. यावर आज सुनावणी होती. ही याचिका याचिकाकर्ते औटी यांनी मागे घेतली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते घन:श्याम शेलार यांनी दिली आहे.

शेलार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 'आपण स्वतः, माजी आमदार राहुल जगताप यांनी मुंबईमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यात स्वतः मंत्री जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी मध्यस्थी केली. तसेच, 'कुकडीच्या पाण्याच्या बाबत दाखल झालेली याचिका मागे घेण्यात आली असून हे सर्व श्रेय मंत्री जयंत पाटील, रोहित पवार यांचे असून आमचे प्रयत्न असल्याचे शेलार म्हणाले.

तसेच, आजच सिंचन भवन येथे पाटबंधारे विभाग वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भेट घेणार असून पाण्याचे फिडिंग करण्यात येईल असे ही शेलार म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com