कुकडीच्या आवर्तनाचा विषय मार्गी लागला- आ. पाचपुते

कुकडीच्या आवर्तनाचा विषय मार्गी लागला- आ. पाचपुते

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला स्थगिती दिल्याने आवर्तना बाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता. मंगळवारी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. यात चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्याने कुकडीच्या आवर्तनचा विषय मार्गी लागला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

आ. पाचपुते म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आपण स्वतः, आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके उपस्थित होते. यावेळी असणारी गरज, पाणी नाही मिळाले तर शेतकर्‍यांचे कधी ही न भरून येणारे नुकसान आदी बाबी जयंत पाटील यांच्या समोर मांडल्या. कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडावेच लागेल ही स्पष्ट भूमिका घेतली. ज्या याचिकेमुळे या विषय लांबला त्या याचिकाकर्त्याना आमदार अतुल बेनके यांनी फोन केला.

जयंत पाटील स्वतः त्यांच्याशी बोलले. पिंपळगाव जोगे धरणासाठी 25 कोटींचा निधी वापरून डेडस्टॉक चे पाणी वापरात आणले जाईल. पाण्याचा कायमचाच प्रश्न मार्गी लागेल. हा कुकडी प्रकल्पातील सर्वांचाच मोठा फायदा आहे. आपण सहकार्याची भूमिका घ्यावी, असे याचिककर्त्यांसस अश्वसित केले. त्यामुळे न्यायालयात होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. न्यायालयाचा निकाल ही सकारात्मक असेल, कुकडी चे आवर्तन तातडीने सुटून सर्वांना पाणी मिळेल, अशी माहिती पाचपुते यांनी दिली.

डिंभे - माणिकडोह बोगद्याचा निर्णय लवकरच

डिंभे ते माणिकडोह बोगदा हा कुकडी प्रकल्पासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. हा बोगदा झाला तर एक आवर्तना एवढे वाया जाणारे पाणी सहज उपलब्ध होऊन सर्वांनाच न्याय मिळेल. या बाबत जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात चर्चा झाली. अशीच एक बैठक घेऊन तो विषय सर्वांना एकत्र बसून मार्गी लागेल, त्यामुळे कुकडी चा मोठा प्रश्न सुटून पाण्या ची कमतरता कधीच जाणवणार नसल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com