कोयता घेऊन फिरणारा युवक पकडला

कोयता घेऊन फिरणारा युवक पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्री कोयता घेऊन फिरणार्‍या युवकाला कोतवाली पोलिसांनी पकडले. मयुर श्यामराव गोरे (वय 24 रा. खुलताबाद, जि. औरंगाबाद) असे पकडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, संदीप थोरात, हिवाळे यांचे पथक गस्ती घालत असताना त्यांना एका दुचाकीवरून युवक जाताना दिसला.

त्याच्याविषयी पोलिसांना संशय आल्याने त्या युवकाची दुचाकी थांबून त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता एक कोयता मिळून आला. त्याने त्याचे नाव मयुर श्यामराव गोरे असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com