कोपरगावच्या कोसंदल यांनी 45 दिवसांत साडेतीन शक्तीपिठांची केली सायकल परिक्रमा

कोपरगावच्या कोसंदल यांनी 45 दिवसांत साडेतीन शक्तीपिठांची केली सायकल परिक्रमा

कोपरगाव (प्रतिनिधी)

मनाचे समाधान आणि आवड या दोन गोष्टीमुळे गेल्या सात वर्षापासून संजयनगर भागातील सुनिल नारायण कोसंदल यांनी तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड आणि वणी सप्तशृंगीदेवी अशा साडेतीन शक्तीपिठांची सायकल परिक्रमा असंख्य दार्तुत्ववानांच्या सहकार्याने 45 दिवसात 1795 किलोमिटर परिक्रमा सायकलवर पूर्ण केली.

सुनिल नारायण कोसंदल यांनी दहावीनंतर सुतारकी, खुर्च्या विणणे, बाजार यात्रा काळात कटलरी सामानाची विक्री, मोलमजुरी करीत जीवनातील संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे जुनी सायकल असून 26 सप्टेंबर घटस्थापनेला त्यांनी कोपरगाव पंचक्रोशीतील ग्रामदैवतांचे दर्शन घेवुन साडेतीन शक्तीपिठ देवी परीक्रमा यात्रेला खिशात जेमतेम पैसे घेवुन प्रारंभ केला. पर्यावरण साधा, इंधन वाचवा, बेटी बचाव बेटी पढाव, असा संदेश देत शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांच्या परिक्रमेस हिरवा झेंडा दाखवत त्यांना रवाना केले होते, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आर्थिक मदतही केली होती. रस्त्यात काय अडचणी येतील याचा विचारही त्यांनी केला नाही मात्र साडेतीन शक्तीपिठांचा आर्शिवाद त्यांच्या पाठीशी बळकट होता.

साईबाबांची शिर्डी, कोल्हार, शनि शिंगणापूर, कानिफनाथ मढी, मायंबा, मोहटादेवी, येरमळादेवी, तुळजापूर, सोलापूर, नरसोबाची वाडी, आप्पाची वाडी, अदमापूर बाळूमामाची मेंढरं, कोल्हापूर, ज्योतिबाचा डोंगर, पंढरपूर, अंबेजोगाई, परळीवैजनाथ, माहुरगड, औंढा नागनाथ, अंतापूर तहाराबाद आणि वणी सप्तशृंगी या प्रवासात ते दररोज 70 ते 80 किलोमिटर सायकल चालवून सायंकाळी देवळात मुक्कामी थांबले. 45 दिवसाच्या प्रवासात त्यांचा अनेकांनी सत्कार करून पाहुणचार केला. 9 नोव्हेंबर रोजी त्यांचे कोपरगावात आगमन झाले. यशस्वी प्रवासाबद्दल त्यांचा अनेकांनी सत्कार केला. 2011 पासुन ते साडेतीन शक्तीपिठ देवी परिक्रमा करत आहेत.  सायकलवर अष्टविनायक यात्राही त्यांनी केलेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com