कोरठण खंडोबाला लागली हळद

प्रतिकात्मक सोहळा साजरा || यात्रा उत्सव रद्द
कोरठण खंडोबाला लागली हळद

पारनेर |प्रतिनिधी| Parner

लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान (Shri Kshetra Korthan Khandoba Devasthan) तीर्थक्षेत्रावर पौष षष्टी मुहूर्तावर प्रतिकात्मक वार्षिक यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने शनिवार, 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पारंपरिक रितीरिवाजानुसार देवाला हळद लावण्याचा विधी (Turmeric) पार पडला.

साधेपणाने फक्त 9 महिलांच्या हस्ते देवाला हळद (God Turmeric) लावण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. सकाळी ग्रामस्थ अनिल वाघमारे, आशिफ पटेल, रंगनाथ वाळुंज, यांनी देवाला मांडवडहाळे आणले. करोना निर्बंध लागू (Corona Restrictions Apply) असल्याने आणि यात्रा उत्सव रद्द असल्याचे परंपरा जतन करण्यासाठी 9 महिलांच्या हस्ते मंदिर आवारात जात्यावर पारंपरिक ओव्या गात देवाची हळद दळन्यात आली. खंडोबाला हळद लावण्याचा प्रथम मान परीट समाजाला असून सौ.हिराबाई वाघमारे यांच्या हस्ते देवाला प्रथम हळद लावण्यात आली. त्यानंतर सौ.शोभा चौधरी, सौ.सुभद्रा आहेर, सौ.सरूबाई वाळुंज, सौ.जयवंताबाई सुंबरे, सौ.नंदा ढोमे, सौ.विमल घुले, सौ.लता वाळुंज, सौ.तारा पुंडे, सौ.सीमा वाळुंज या महिलांच्या हस्ते देवाला हळद लावली.

सनईच्या मंगल सुरात देवाला हळद लावण्याचा पारंपरिक कार्यक्रम (Programme) प्रतिकात्मक भक्तिमय वातावरणात पार पडला. पौष पोर्णिमा यात्रा करोना प्रादुर्भावामुळे रद्द (Canceled due to corona outbreak) असल्याने देवाची हळद गावातून मिरवण्यात आली नाही. यात्रा काळात 3 दिवस दर्शनासाठी मंदिर बंद राहणार असून मंदिराकडे येणारे रस्ते पोलिसांकडून बंद ठेवण्यात येणार आहेत. यात्रा काळात दुकानदारांनी दुकाने लाऊ नये व भाविक भक्त यात्रेकरूनी मंदिर दर्शनासाठी येऊ नये, असे अवाहन देवस्थान व प्रशासनासनाकडून करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com