कोरठण खंडोबा मंदिर 451 वर्षापूर्वीचे

शिलालेखाच्या अनुवादानंतर आले समोर
कोरठण खंडोबा मंदिर 451 वर्षापूर्वीचे

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले कोरठण खंडोबा मंदिर हे 451 वर्षापुर्वीचे असल याचे येथील शिलालेखाच्या मराठी अनुवादानंतर समोर आले आहे. हा अनुवाद सर्वांसाठी प्रकाशीत करण्यात आला आहे.

कोरठाण खंडोबा देवस्थान राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्र आणि लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. या पुरातन मंदिरात असलेल्या शिलालेखाचा मराठी अनुवाद पुणे येथील पुरातन शिलालेखांचे अभ्यासक अनिकेत रचपुत यांनी केला आहे. यातून हे मंदिर 451 वर्षापूर्वी बांधण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या शिलालेखांचा अनिकेत रजपूत यांनी केलेला मराठी अनुवाद असलेल्या फलकाचे अनावरण देवस्थानचे अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते श्री कोरठण खंडोबा मंदिरात करण्यात आले.

या शिलालेखात एकूण 9 ओळी असुन पहिल्या पाच ओळी अस्पष्ट झालेल्या आहेत. कारण शिलालेख शेकडो वर्षे बांधकामात झाकून राहिलेला होता. सन 1994-97 दरम्यान श्री खंडोबा मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू असताना हा शिलालेख मंदिर गाभार्याचे दरवाजाच्या वर आढळून आला. तेव्हापासून या शिलालेखाचा मराठी अनुवाद मिळवण्याचा प्रयत्न चालू होता त्यापैकी पुणे येथील पुरातन शिलालेखांचे अभ्यासक अनिकेत रचपूत यांनी अभ्यास करून या शिलालेखाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे.

1571 नंतर आज 451 वर्षांनी या शिलालेखाच्या मराठी अनुवादामुळे कोरठण खंडोबा मंदिराचे पुरातन बांधकाम कोणी व कधी केले. हा ऐतिहासिक पुरावा मिळाला आहे. या मंदिराचे पुरातन बांधकाम माघ पौर्णिमा शुभमुहूर्तावर झाल्याचे आणि त्या बाबतच्या शिलालेखाचे मराठी अनुवादाचे मंदिरात अनावरण होत असल्याचा हा पौर्णिमेचा योगा योग घडून आल्याचे अध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी विश्वस्त बन्सी ढोमे, सुरेश गुंजाळ (कांदळी), पुरोहित अरुण कुलकर्णी,अ रामदास मुळे, शिवाजी ढोमे ,संभाजी मुंढे, ज्ञानेश्वर जाधव, राजू जाधव, बबन सुपेकर (सर), भाविक-भक्त ग्रामस्थ उपस्थित होते.

असा आहे शिलालेख

शिलालेखात एकुण 9 ओळी असून यामधील शेवटच्या चार ओळींचा मराठी अनुवाद स्पष्टपणे देण्यात आला आहे.त्यानुसार खंडोबाचे हे पुरातन देऊळ जावजी विश्वासरावांचा मुलगा कुमाजीराव यांनी माघ शुद्ध 15 शके 1492 = 10 फेब्रुवारी 1571 माघ पौर्णिमा प्रमोद संवस्तरे शुक्रवार मघा नक्षत्र व शोभल योग असताना हे देऊळ बांधले. यात निजामाचा उल्लेख असून त्या काळात पहिला निजाम मुर्तेजा-निजामशहा गादीवर होता हा एतिहासही स्पष्ट होतो.

Related Stories

No stories found.