कोर्‍हाळेचा पै. श्याम मुर्तडकची कुस्ती स्पर्धेत बाजी

राहात्यात रंगला कुस्त्यांचा आखाडा; 225 स्पर्धकांचा सहभाग
कोर्‍हाळेचा पै. श्याम मुर्तडकची कुस्ती स्पर्धेत बाजी

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरात विरभद्र व नवनाथ देवांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात कोर्‍हाळे येथील पै. श्याम मुर्तडक याने या स्पर्धेत बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला तर कोर्‍हाळे येथील पै. शुभम पाचोरे यास दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

राहाता येथील विरभद्र व नवनाथ देवांच्या यात्रेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी सायंकाळी 5 वाजता भव्य कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन विरभद्र देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 225 पैलवानांनी सहभाग नोंदवला. नगरपरिषदेच्या भव्य मैदानात लाल मातीच्या आखाड्यात कुस्त्यांचा अतिशय सुंदर सामना रंगला.

गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या पार्श्वभूमीमुळे राहाता शहरात प्रत्येक वर्षी आयोजित होणार्‍या कुस्ती स्पर्धेचा हंगाम बंद असल्यामुळे अनेक कुस्तीप्रेमींना या स्पर्धा पाहण्यासाठी मुकावे लागले. परंतु यावर्षी करोना संसर्ग पूर्णतः कमी झाल्याने कुस्त्यांचा सामना रंगतदार झाला. कुस्ती प्रेमींनी मनसोक्त आनंद घेतला.

यावेळी प्रथम क्रमांक पटकावणार्‍या कोर्‍हाळे येथील पै. श्याम मुर्तडक यास देवस्थानच्यावतीने 11 हजार रुपये रोख रक्कमेचे रोख पारितोषिक द्वितीय क्रमांक शुभम पाचोरे कोर्‍हाळे 7555 तृतीय क्रमांक मयूर चांगले कोर्‍हाळे 5555 चतुर्थ क्रमांक मंगेश धनराज मुतडक कोर्‍हाळे 4100, पाचवा क्रमांक महेश फुलमाळी जंगली महाराज आश्रम कोपरगाव 3100 तर सहावा क्रमांक मंगेश मुर्तडक कोर्‍हाळे 2100 या प्रथम सहा स्पर्धकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या स्पर्धेत राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील पैलवानांनी उत्कृष्ट कामगिरी करत सहा पैकी पाच बक्षिसे पटकावण्याचा मान मिळवला. यावेळी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, संजय सदाफळ, ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राहुल सदाफळ, मुन्ना सदाफळ, गणेश बोरकर, गोटू बोरकर, अजय आग्रे, प्रवीण सदाफळ, ज्ञानेश्वर सदाफळ, तुषार सदाफळ, विनोद गाडेकर, संजय भाकरे, बबन बनसोडे, सोमनाथ गांगुर्डे, अमोल गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, महेश बोरकर, योगेश डांगे, डॉ. महेश गव्हाणे, डॉ. सुरेश बोठे, पोपटराव कोल्हे, अनिल बोठे, चांगदेव गिधाड, शिवाजी सदाफळ, रावसाहेब धुमसे, दिलीप वाघ, सागर भुजबळ, विजय गाडेकर, निवृत्ती बनकर, विजय गाडेकर, अण्णासाहेब लांडबिले, देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत यांच्यासह शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.