कोऱ्हाळे-रांजणगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली

विद्यार्थ्यांना शोधावी लागतेय शाळेत जाण्यासाठी वाट..!!

कोर्‍हाळे |वार्ताहार| Korhale

राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे रांजणगाव रस्तावरील पुल गेले पंधरा ते वीस दिवसापासून पाण्याखाली गेला असून शाळकरी मुले, दूध उत्पादक शेतकरी, नोकरदार यांना वनीकरण विभागाच्या काटवणातून मार्ग काढत चिखलाच्या गाळातून पायपीट करावी लागत असल्याचा धक्कादायक राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे समोर आला आहे.

या रस्त्याची दखल कोणी घेईल का असा मोठा प्रश्न निर्माण होतोय. स्थानिक प्रशसनाला दोन वर्षापूर्वी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुलाची उंची वाढवण्याचे आदेश देऊन सुद्धा लोक प्रतिनिधी यांच्या आदेशाला स्थनिक प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याच बोललं जातंय.

सलग आठ ते दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झालं असून रांजणगाव कोर्‍हाळे हा पूल पाण्याखाली गेल्याने शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याच संबंधी पालक शालेय विद्यार्थी दूध उत्पादक शेतकरी याच्या काळात या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com