दोन कंटेनरचा भीषण अपघात; एका कंटेनर चालकाचा तुटला पाय

दोन कंटेनरचा भीषण अपघात; एका कंटेनर चालकाचा तुटला पाय

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

कोपरगाव (Kopergoan) तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या दहेगाव येथील मुंबई - नागपूर हायवेवर (Mumbai - Nagpur Highway) दहेगाव चौफुली (Dahegoan Chaufuli) येथे दोन कंटेनरच्या समोरा-समोरील झालेल्या अपघातात एका कंटेनर चालकाचा पाय तुटल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. (container accident kopergoan)

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी कंटेनर क्रमांक सी जी ०७ सी ए ५५४४ हा कोपरगावहून (Kopergoan) औरंगाबादकडे (Aurangabaad) बांधकाम साहित्य (Construction materials) घेऊन चालला होता. तर दुसरा कंटेनर एम एच ४८ ए वाय १६०२ हा रिकामा कोपरगाव च्या दिशेने येत असतानाच तालुक्यातील दहिगाव चौफलीच्या (Dahegoan Chaufuli पुढे कोपरगावकडे येणाऱ्या कंटेनरने आपल्या पुढे जाणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कोपरगावकडे जाणाऱ्या कंटेनरच्या कॅबीनचे तोंड विरूद्ध दिशेला झाले.

या अपघातात जखमी कंटनेर चालक यास रूग्णवाहीकेत श्री संत जनार्धन स्वामी रुग्णालयात (Shri Sant Janardhan Swami Hospital) दाखल करण्यात आले असून दुसरा कंटेनर चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. दहिगावचे प्रभारी पोलीस पाटील गणेश खिलारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर लोटण्याचा प्रयत्न करून ट्रॅफीक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळ ट्राफिक बंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहानांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com