हे देवाऽऽ! चोरट्यांनी लांबविली मंदिरातील दानपेटी

हे देवाऽऽ! चोरट्यांनी लांबविली मंदिरातील दानपेटी

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव (Kopergoan) तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या चांदेकसारे (Chandekasare) येथील बाल भैरवनाथ (Bal Bhairavnath Temple) व माता जोगेश्वरी मंदिरातील (Mata Jogeshwari temple) दानपेटी (Donation Box) अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री लांबवल्याची होण्याची घटना घडली आहे.

हे देवाऽऽ! चोरट्यांनी लांबविली मंदिरातील दानपेटी
शस्त्राचा धाक दाखवुन धाडसी दरोडा; मोठा ऐवज लुटला

सध्या करोना परिस्थिती (COVID19) असल्यामुळे मंदिर बंद (Temple close) आहे. याचाच फायदा या चोरट्यांनी घेत नवीन बसवलेली दानपेटी लांबवली. सकाळी देवपूजासाठी आलेल्या पुजाऱ्याच्या घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ माहिती ग्रामस्थांना दिली. चोरट्याने लांबवलेल्या दानपेटीत पन्नास ते साठ हजार रुपयांची रोकड असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चोरट्यांनी रात्री मंदिराच्या मेन गेटचे‌ कुलप तोडत थेट मंदिरात प्रवेश करत ही दानपेटी उचलून नेली. सदर घटनेची माहिती माजी सरपंच केशवराव होन यांनी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस (Koprgoan Police Station) स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली असता श्वान पथक (Dog squad) घटनास्थळी दाखल झाले. काही ठिकाणी माग काढत त्यांनी घडलेल्या परिस्थितीचा पंचनामा केला. श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्टने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जाधव यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com