बिबट्याकडून शेळी फस्त; स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याकडून शेळी फस्त; स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव (Kopergoan) तालुक्यातील सोनेवाडी (Sonewadi) राऊत वस्ती परिसरात बिबट्याने (leopard attack) गोठ्यातील शेळीवर झडप मारत शेळीला ठार केले. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्या असल्याची चर्चा होती अखेर बिबट्याचे माग काढत बिबट्याच असल्याची खात्री पटली आहे.

बिबट्याकडून शेळी फस्त; स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आश्चर्यकारक! एकाच अपघातात 'त्या'ने दोन वेळा मृत्यूला दिला चकवा, पाहा VIDEO

याबाबत घटलेली माहिती अशी की गुरुवारी पहाटे चार वाजता हेमराज कारभारी राऊत यांच्या वस्तीवर बिबट्याने चाल केली. सर्वे नंबर 48/1 मध्ये असलेल्या भगवान हेमराज राऊत यांच्या शेळ्याच्या गोट्यावर बिबट्याने हल्ला केला. शेळीच्या नरड्याचा घोट घेऊन शेळी बाजूच्या कैलास राऊत यांच्या शेतात ओढत नेत तीत्यावर ताव मारला. गोठ्यातील शेळया ओरडण्याचा आवाज आल्यानंतर भगवान राऊत, चंद्रकला राऊत यांना जाग आली. डोळ्यादेखत बिबट्या शेळीची शिकार करत असल्याचे त्यांनी पाहिले.

बिबट्याकडून शेळी फस्त; स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

त्यांनी प्रसंगावधान राखत जनार्धन राऊत, सविता राऊत, कैलास राऊत यांना आरडाओरडा करत घटनास्थळी बोलवले. आरडाओरडा करत हार्न वाजवत बिबट्याला तेथून पळून लावण्यात आले. सदर घटनेची माहिती गणेश राऊत यांनी पोलीस पाटील दगु गुडघे यांना दिली. वन विभागाची संपर्क साधल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

रामदास राऊत ,कैलास राऊत, गणेश राऊत ,शशिकांत लांडगे या पंचांच्या उपस्थितीत वन विभागाच्या अधिकारी संजय साखरे यांनी पंचनामा केला. हा बिबट्याच असल्याची खात्री त्यांची पटली. सोनेवाडी परिसरात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या बिबट्याने शेळी, बोकड, कुत्री आदींची शिकार केली असल्याच्या घटना घडल्या आहेत. आता मात्र वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

बिबट्याकडून शेळी फस्त; स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
धनंजय मुंडेंनी बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप

Related Stories

No stories found.