विद्युत रोहित्र फोडून ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास

विद्युत रोहित्र फोडून ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील डाऊन खुर्द येथे रविवारी रात्री चोरट्यानी थेट शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रावरच डल्ला मारत हे रोहीत्र फोडून यामधील असलेले मॅग्नेट गट्टा, काँयल, आँईल व पट्ट्या चोरून नेल्या आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की डाऊच खुर्द परिसरातील राधाजी काशिनाथ गुरसळ, ज्ञानेश्वर दत्तात्रय गुरसळ यांच्या शेतातील 25 हॉर्स पावर असलेले दोन डीपी रात्री चोरट्यांनी फोडत यामधील जवळपास 30 ते 35 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. गुरसळ यांनी याबाबत महावितरण कंपनीचे लाईनमन जेजुरकर यांना ही माहिती दिली.

कोपरगाव तालुक्यात विद्युत मोटारी स्टँटर केबल शेतकऱ्यांचे पाईप आदी चोरीचे सत्र सुरू आहे. मात्र थेट विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रावरच चोरट्या़ंनी डल्ला मारल्यामुळे शेतकरी हवालदिन झाले आहे. पावसाने ओढ दिल्याने आता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पेरलेल्या सोयाबीन, मका, ऊस आदी पिकांना पाणी देणे गरजेचे असतानाच अशा घटना घडल्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या चोरट्यांचा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com