Samrudhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वरील अपघात थांबेना! भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Samrudhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वरील अपघात थांबेना! भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Samrudhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वरील अपघात थांबेना! भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
Buldhana Bus Accident : मुलाला कॉलेजला सोडलं अन् विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली, बुलढाणा अपघातात आई वडिलांसह मुलीचा मृत्यू

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीयेत. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमीक माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Samrudhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वरील अपघात थांबेना! भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
Buldhana Bus Accident : बसचा टायर फुटलाच नाही, 'या' कारणामुळे झाला अपघात... RTO चा खळबळजनक रिपोर्ट
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com