ATM फोडले, रकमेसह मशीनही चोरून नेले, पण....

नेमकं काय घडलं?
ATM फोडले, रकमेसह मशीनही चोरून नेले, पण....

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल मध्यरात्री चोरट्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून मशीन मधील सर्व रक्कम चोरून नेली. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी एटीएम मशीन देखील आपल्याबरोबर नेले आहे. यामुळे पोहेगांव परिसरात घबराट निर्माण झाली असून व्यापारी संकुलात आघाडीवर असलेल्या गावचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिवारी पहाटे 3 वाजता अज्ञात चोरटे यांनी परिसरातील वातावरणाचा आढावा घेत इंडियन ओव्हरसीजच्या एटीएम मशिन रूममध्ये प्रवेश केला. लोखंडी टॉमी व इतर इलेक्ट्रिक साहित्याच्या आधारे त्यांनी आजुबाजुचे सर्व अँगल व मशीनची तोडफोड केली. साधारण चार ते पाच हे चोरटे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर घटना बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून चोरटे कशा पद्धतीने चोरी करत आहे याचे सर्व चित्रीकरण झाले आहे.

ATM फोडले, रकमेसह मशीनही चोरून नेले, पण....
Monsoon Update : यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर

एटीएम फुटल्याची माहिती पोलीस पाटील जयंतराव रोहमारे यांनी शिर्डी पोलिसांना देतात पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस नाईक अविनाश मकासरे, पोलीस कॉन्स्टेबल दळवी, पोलीस कॉन्स्टेबल बाबा आहेर, वर्पे घटनास्थळी दाखल झाली. बँकेचे मॅनेजर बी डी कोरडे,राम गौर यांना याबाबत त्यांनी माहिती विचारली असता शुक्रवारी संध्याकाळी बँकेची सुट्टी झाल्यावर बँकेत 1 लाख 32 हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने बँकेचे सीसीटीव्ही फुटेज शेजारील गौतम सहकारी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. चोरट्यांनी सदर एटीएम मशीन खोलून नेण्यासाठी पिक अप गाडीचा वापर केला होता. चोरट्यानी मशीन खोलल्यानंतर अतिशय वजनदार मशीन गाडीत टाकता न आल्याने त्यांनी वायर रोप लावत गाडीच्या मागच्या बाजूला ते बांधून पोहेगांव पाथरे रोडने शिंदे वस्ती लगत गोदावरी उजव्या कॅनॉलच्या कडेला निर्जन ठिकाणी नेले असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते कैलास औताडे यांना आला.

ATM फोडले, रकमेसह मशीनही चोरून नेले, पण....
सीसीटीव्ही बसवण्यास प्राधान्य द्यावे; पोलिसांचे व्यापारी, नागरीकांना आवाहन

त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक दुधाळ यांना दिली असता सर्वांना बरोबर घेत ते ठिकाण गाठले. मशीन हेवी असल्याने चोरट्यांना ते फोडता आले नाही. सदर मशीन त्यांनी कँनालच्या कडेला काट्या टाकून लपून ठेवले. लपलेले मशीन पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी जेसीबीच्या साह्याने हे मशीन शिर्डी पोलीस स्टेशनला पाठवले आहे. दोन तास चोरीचे प्रयत्न करून चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याची चर्चा दिवसभर गावात पसरली.

पोहेगांव एटीएम चोरीची ही तिसरी घटना असू परिसरात व्यापारी वर्गाचे मोठे जाळे झाले आहे. अशा घटना घडल्याने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डी पोलीस स्टेशनने याबाबत निर्णय घेऊन एक तर पोलीस दूरक्षेत्र चालू करावे अन्यथा रात्रीची गस्त सुरू ठेवावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com