कोपरगावमध्ये आ.काळे-कोल्हेंमध्ये जोरदार राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

कोपरगावमध्ये आ.काळे-कोल्हेंमध्ये जोरदार राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यासह राज्याला सर्वश्रुत असलेले काळे- कोल्हे प्रतिस्पर्धी दोन्ही नेत्यासह कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कोपरगाव येथे नगर पालिका हद्दवाढ भागातील गवारे नगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डिंग कॉर्नर ते रॉयल ड्रेमपर्यंत ७०० ते ८०० मीटर डांबरीकरण करणे अंदाजित रक्कम २० लाख १७ हजार ३०० या कामाचा भूमिपूजन शुभारंभ करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला.

कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्याच्या कारणावरून दोन्ही ही समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की होऊन दोन्ही समर्थक भिडले. शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फारसा यशस्वी होत नसल्याचे दिसत असल्याने शेवटी परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमाव पांगवला. तसेच नंतर पोलीस प्रशासनाने गर्दी पांगवून दिली. त्यानंतर उद्घाटनाचे दोन्ही नेत्यांचे फ्लेक्स पालिका प्रशासनाने तात्काळ काढून घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com