उल्का सदृश वस्तू छत तोडून थेट घरात

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील घटना
उल्का सदृश वस्तू छत तोडून थेट घरात

रांजणगाव देशमुख (वार्ताहर)

कोपरगाव तालुक्यातील भोजडे शिवारात मंगळवारी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी उल्कापात सदृश घटना घडली असून याबाबत अनेकांकडून तर्क वितर्क वर्तविले जात आहे. सदर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील भोजडे चौकी शिवारात सकाळी किरण बबनराव ठाकरे यांच्या घराच्या छताचा पत्रा फुटून घरातील कोब्यालाही खोलवर उल्कापात सदृश घटनेने खड्डे पडले आहे. सदरची ठिकाणी किरण ठाकरे हे पलंगावर मोबाईल पाहत असताना पत्र्याचा आवाज होत त्यांना ज्वलनशील वस्तू घरात पडताना दिसली.

तसेच त्यांच्याशेजारच्या महेंद्र शिनगर हे बाहेर उभे असतानाही त्यांनाही ज्वलनशील वस्तू आकाशातून पडताना दिसली. याबाबत किरण ठाकरे यांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी आले. पोलीसानी सदर उल्का सदृश्य वस्तू आपल्या ताब्यात घेतली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत

उल्कासदृश दगड हा साधारण तीन किलो वजनाचा असून एक बाय एकचा पत्र फुटलेला आहे. तर जमिनीवर तो पडल्याने जमिनीला खड्डा पडून त्या उल्क सदृश्य वस्तूचे तुकडे झाले होते. सदर घटनेने शेजारी बसलेले किरण ठाकरे हे सुदैवाने या घटनेतून थोडक्यात बचावले आहे. सदर घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अनेक नागरिक या ठिकाणी पाहण्यासाठी येत आहे. सदर घटना उल्कापातच असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप मात्र या घटनेला अधिकृत दुजोरा कोणीही दिला नाही

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com