उसतोडणी कामगारावर बिबटयाचा हल्ला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोपरगाव | वार्ताहर

तालुक्यातील वैजापुर सुराळा आणि कोपरगाव तळेगांवमळे शिवाराच्या हद्दीतील सिकंदरभाई यांच्या शेतात उसतोडणी करताना कामगार अशोक कारभारी दळवी यांच्यावर भल्या पहाटे ४ वाजता बिबटयाने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहे.

संग्रहित छायाचित्र
भयंकर! हॉटेलच्या ४२ व्या मजल्यावरून दगड कोसळून दोघांचा जागीच मृत्यू, वाहनांचाही चुराडा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळवर उसतोडणीच्या कामासाठी मुकादम उत्तम पुंजाजी पगारे यांनी जळगाव जिल्हयातील भायगांव येथील उसतोडणी कामगारांची टोळी आणली असून त्यातील अशोक कारभारी दळवी हे बुधवारी भल्या पहाटे तळेगांवमळे शिवारात उसतोडणीसाठी गेले होते.

संग्रहित छायाचित्र
दिल्लीत 'श्रद्धा' हत्याकांडाची पुनरावृत्ती! आधी प्रेयसीला संपवलं, ढाब्यावरील फ्रिजमध्ये मृतदेह लपवला अन् मग...

ते पहाटे ४ वाजता सिकंदरभाई यांच्या शेतात उसतोडणीचे काम करत होते. उसाच्या पाचटामध्ये दडुन बसलेल्या बिबटयाने अचानक अशोक दळवी यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली इजा झाली. अशोक दळवी यांनी वेळीच स्वत:ला सावरले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा त्यांच्या जीवीतास मोठा धोका झाला असता.

संग्रहित छायाचित्र
धक्कादायक! अतिक्रमण हटवताना झोपडीला आग, मायलेकीचा होरपळून मृत्यू
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com