Kopergoan Gram Panchayat Election Result : गुलाल कुणाचा? कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एका क्लिकवर

Kopergoan Gram Panchayat Election Result : गुलाल कुणाचा? कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एका क्लिकवर

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

कोपरगांव तालुका राजकीयदृष्ट्या कोल्हे- काळे यांच्या संघर्षामुळे राज्यात सर्वश्रुत असून तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून पहिल्या फेरीतील आघाडीची शिंगणापूर ग्रामपंचायत कोल्हे गटाने जिंकली असून यात सरपंच पदासह १४ जागावर विजय मिळवला आहे. तर यात आ. काळे गटाला मात्र केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान पहिल्या टप्प्यात मतमोजणी झालेल्या सडे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांसह सरपंच पदावर आ. काळे गटाने सलामी दिली आहे. यात कोल्हे गटाला केवळ दोन जागांवर म्हणावे लागले आहे.तर भोजडे ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासह सर्वच्या सर्व ९ जागा काळे गटाने पटकावल्या आहेत. खिर्डी गणेश ग्रामपंचायत सरपंच पदासह आठ जागा कोल्हे गटाने पटकावल्या आहेत. तर सत्ताधारी परजणे गटास केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Kopergoan Gram Panchayat Election Result : गुलाल कुणाचा? कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एका क्लिकवर
Gram Panchayat Election Result : चांदेकसारेत कोल्हे गटाला धक्का तर डाऊच खुर्दला गुरसळ यांनी मारली बाजी

तर कोळपेवाडी हा पारंपरिक गड काळे गटाने सरपंच पदासह नऊ जागा पटकावून कायम राखला आहे. तर कोल्हे गटास ४ जागा मिळाल्या आहे. दरम्यान माहेगाव हा आ. काळेंचे स्वतःचे गाव असताना मागील निवडणुकीत नेमके सरपंच पद गमवावे लागले होते. मात्र यावेळी ते सावध आढळले असून त्यांनी सरपंच पदासह दहा जागा आपल्या शिरपेचात खोवल्या आहे. तर कोल्हे गटास केवळ एक जागा मिळाली आहे.

चांदेकसारे येथे सरपंच पदासह काळे गटास ११ प्राप्त झाल्या आहे. कोल्हे गटास 2 जागा प्राप्त झाल्या आहेत. सरपंच पदी किरण विश्वनाथ होन हे विराजमान झाले आहेत. डाऊच खुर्द ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे संजय गुरसळ सरपंच पदी विजयी झाले आहे. तर वेस-सोयगाव ग्रामपंचायत निवडणुकित अपक्ष गटाने सरपंच पदासह चार जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.

Kopergoan Gram Panchayat Election Result : गुलाल कुणाचा? कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एका क्लिकवर
विवाहितेचा मृतदेह हौदामध्ये आढळल्याने खळबळ, पतीसह सासू पोलिसांच्या ताब्यात.. कुठे घडली घटना?

दरम्यान बहादरपूर या कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायत आ.काळे गटासह अन्य सहकारी गटांनी बाजी मारली असून सरपंच पदासह सर्व जागा गमावल्या आहेत.दरम्यान वडगाव, पढेगाव, शहापूर, आदी ठिकाणी सरपंच पद काळे गटाने आपल्या पदरात पाडून घेतल्या आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com