नागपूर-मुंबई महामार्गावर डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी

एक जण टँकर खाली दबल्याची भीती
नागपूर-मुंबई महामार्गावर डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी

रांजणगाव देशमुख | वार्ताहर

नागपूर-मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात होटेल द्वारकमाई जवळ डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास पलटी झाला आहे.

ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे. यात एक मोटारसायकल चालक जखमी झाला आहे तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एम एच ४६ बी बी ३०६६ हा बैलगाडीला ओव्हरटेक करताना पलटी झाला. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यास कोपरगाव येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.

पलटी झालेला टॅंकर काढण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले असून दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.

या ठिकाणी कोल्हे कारखाना व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून दोन रुग्णवाहिकाही तातडीने दाखल झाल्या आहेत. संबंधित कंपनीशी कळविले असून त्यांचे तंत्रज्ञ या ठिकाणी पोहोचत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com