ब्राह्मणगाव येथे धाडसी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

ब्राह्मणगाव येथे धाडसी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे बुधवार (दि २६) रात्री ११ ते गुरुवार (दि २७) रोजीच्या मध्यरात्री २:३० च्या सुमारास अज्ञात चोरट्याने सुमारे पाच लाख ७० हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे राहणाऱ्या माधव भालचंद्र देव (वय 56) यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे पाच लाख ७० हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरुन नेल्याने परिसरामध्ये मोठ्या घबराटीचे वातावरण आहे.

ब्राह्मणगाव येथे धाडसी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास
Crime News : क्षुल्लक कारणावरुन वाद, दगडाने वार करून निर्घृणपणे संपवलं

यामध्ये १ लाख ७५ हजार रुपये रोख, चार तोळ्याचे मनी मंगळ सूत्र एकूण तीन अंदाजे किंमत ९० हजार रुपये, ६०हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे नेकलेस, २० हजार रुपयांची एक तोळ्याची सोन्याची चैन, २० हजार रुपये किमतीचे देवीच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, २ सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या, १लाख ८०हजार रुपये किमतीचे नऊ किलो चांदीचे दागिने, व पाच हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल यांचा समावेश आहे.

ब्राह्मणगाव येथे धाडसी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास
वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

घरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे भालचंद्र देव यांनी नुकतीच मका व विकून पैशांची जमवाजमाव जमा केली होती व सोने देखील कार्यक्रमासाठीच बँकेतून घरी आणले होते. घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय सातव यांनी भेट दिली आहे. याबाबत माधव भालचंद्र देव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक पोलीस करत आहे.

ब्राह्मणगाव येथे धाडसी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास
APMC Election 2023 : राहुरीमध्ये मतदानावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस; मतदार, उमेदवार अन् निवडणूक यंत्रणेची उडाली धांदल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com