
कोपरगाव | प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील 'लव्ह जिहाद' प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला इंदोर हरी मस्जिद जुना पेठा येथील आरोपी मौलवी मोहंमद सोयब नुरी (वय-३१) यास अटक करून आज कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस दि.१९ जुलै म्हणजेच ०२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोपरगाव येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मुलीस फूस लावून तिला आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसवून या घटनेतील आरोपी सायम कुरेशी याने तीन वर्षांपूर्वी संबंधित फिर्यादी मुलीशी तिच्या भ्रमणध्वनी वरून संपर्क करून व मैत्रीचे नाटक केले व तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते.व तिला मस्जिदीत नेऊन दि.२१ मे रोजी सकाळी ०६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आरोपी सायम कुरेशी याने तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.व त्यानंतर तिला कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाच्या बाहेर बोलावून तिला खडकी येथील मदरसा येथे येण्यास सांगितले असता तिने त्यांना त्याबाबत विरोध केला असता तिच्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती.या प्रकरणी अ.नगर जिल्ह्यासह राज्यभर मोठा धुराळा उडाला होता. या प्रकरणी हिंदू संघटनांनीं येत्या गुरुवार दि.२० जुलै रोजी कोपरगाव बंदची हाक दिली असून मोठा मोर्चा आयोजित केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गंभीर दाखल घेऊन त्यातील तीन आरोपी इमरान आयुब शेख (वय-३१),फय्याज वहाब कुरेशी (वय-४५), सायन शहाबुद्दीन कुरेशी (वय-१९),आदींना अटक केली होती व त्यांना कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठ न्यायदंडाधिकारी पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि.१८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असताना पोलीस अधिकाऱ्यांनी आणखी एक मौलाना आरोपी मोहंमद सोयब नुरी (वय-३१) रा.हरी मस्जिद जुना पेठा इंदोर यास बेड्या ठोकून आज दुपारी ३.२० वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता त्यात पोलीस अधिकारी रोहिदास ठोंबरे यांनी आणखी एक आरोपी छोटू उर्फ कलीम हा अटक करावयाचा बाकी असून तो इंदोर येथे लपून बसला असल्याची शक्यता असून त्याचा शोध घेणे बाकी असून तो शोधण्यासाठी किमान या आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
तर आरोपीचे वकील यांनी या आधी तीन आरोपी अटक केले असून त्यांची पोलीस कोठडी दि.१८ जुलै रोजी संपत आहे. व एक आरोपीचा आणि या आरोपीचा संबंध नाही त्यामुळे यास कमीत कमी कोठडी मंजूर करावी अशी मागणी केली आहे. सरकारी वकील यांनी या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण न्यायदंडाधिकारी पंडित यांनी आरोपीस ०२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप एक आरोपी जेरबंद करण्याची गरज असून कोपरगाव शहर पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान या घटनेवर शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हे लक्ष ठेवून आहे. त्यास लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आज कोपरगाव शहर पोलिसांनी आज शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे प्रमुख उपस्थितीत विविध पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पोलीस ठाण्याच्या सभागृहात बोलावली होती. त्यात त्यांनी हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींना 'हिंदू जनाक्रोश मोर्चा' रद्द करण्याची विनंती केली असता त्यास उपस्थित प्रतिनिधींनी नकार दिला आहे. व आगामी दि.२० जुलै रोजी संपन्न होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी झोकून दिले आहे. त्यासाठी सामाजिक संकेतस्थळावर विविध प्रसिद्धी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.व विविध ठिकाणी बैठकीचा सपाटा सुरु ठेवला आहे.