पोहेगाव गोळीबार प्रकरणातील दुसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोहेगाव गोळीबार प्रकरणातील दुसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोनेवाडी (वार्ताहर)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे गावठी कट्टा दाखवण्याचे नादात दिरानेच भावजयीवर केलेल्या गोळीबारामुळे सुनिता संजय भालेराव यांचा उपचारादर मृत्यू झाला. मुख्य आरोपी विशाल भालेराव याला घटना घल्यानंतर दोन तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मात्र त्याच्यासोबत असलेले दोन आरोपी सिद्धार्थ कदम व अमोल दिनकर भालेराव हे दोघे पसार होते. काल यातील अमोल भालेराव या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. मात्र तिसरा आरोपी सिद्धार्थ कदम हा अजूनही पसार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे.

गुरुवारी सकाळी झालेल्या गोळीबारामुळे पोहेगाव परिसर संपूर्ण हादरला असुनही अवैद्य गावठी कट्ट्याची दहशत पोहेगावात पसरली आहे. चोरी, अवैध धंदे व लुटमारीच्या अनेक घटना पोहेगाव परिसरात घडल्या असून आता थेट गावठी कट्टे वापरणाऱाचे प्रमाण वाढले आहे.

गोळीबारासारख्या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गोळीबार प्रकरणातील पकडण्यात आलेल्या आरोपींकडून शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, सहाय्यक उपपोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे प्रकरण कसे घडले याची कसून चौकशी करत आहे.

पोहेगाव परिसरात चोर्‍या मार्‍या व लुटमारीच्या घटना राजरोस घडत असून अवैद्य धंदे वाढले आहे. नागरिकांमध्ये सध्या गावठी कट्ट्यांची दहशत आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या तरुणांकडे एक नव्हे दोन गावठी कट्टे असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com