चांदेकसारेमध्ये बाल भैरवनाथ, माता जोगेश्वरी मंदिरातील दानपेट्या फोडल्या

चांदेकसारेमध्ये बाल भैरवनाथ, माता जोगेश्वरी मंदिरातील दानपेट्या फोडल्या

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात रात्री 11 ते 12 च्या दरम्यान चोरट्यांनी मंदिरात असलेल्या दोन दानपेट्या कटरच्या साह्याने फोडून मोठी रक्कम लांबवली असल्याची घटना घडली आहे. रात्री पेट्या फोडून चोरट्यांनी त्यामधील रक्कम चोरून नेली.

सकाळी मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेल्या भाविकांना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. मंदिरावर काम करणारे श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मंदिरात दाखल झाले. घटनेची माहिती पोलीस पाटील मीराताई रोकडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली आहे.

चोरटे चोरी करत असतानाची घटना मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मंदिरात दानपेट्या फोडण्याची ही दुसरी घटना असून हे चोरटे याच परिसरातील व माहीतील असल्याचे सांगण्यात येते. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस फाटा घटनास्थळी रवाना केल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

या दानपेटीमध्ये नेमकी रक्कम किती होती याचा अंदाज आल्या नसल्याने नेमकी किती रक्कम चोरून नेली हे गुलदस्त्यात आहे. मंदिरामध्ये व देवाच्या गाभाऱ्यात दोन दानपेट्या ठेवलेल्या आहेत. या बरीव व भक्कम दानपेट्या चोरट्यांनी इलेक्ट्रीक कटरच्या साह्याने तोडून त्यामधील रक्कम लांबवली पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे अंतर्गत सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com