कोपरगावच्या महिलेची दोन बनावट अकाऊंटव्दारे बदनामी

बदनामी करणार्‍याविरूध्द सायबर पोलिसांत गुन्हा
कोपरगावच्या महिलेची दोन बनावट अकाऊंटव्दारे बदनामी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोपरगाव तालुक्यातील एका महिलेच्या नावे फेसबुकवर दोन बनावट अकाऊंट तयार करून महिलेसह तिच्या कुटूंबाची बदनामी केल्याचा प्रकार 5 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान घडला. या प्रकरणी पीडित महिलेने 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 354 (अ), 500 सह आयटी अ‍ॅक्ट कलम 66 (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या फोटोचा व नावाचा वापर करून एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर फिर्यादी यांच्या नावाचा वापर करून त्यापुढे कॉल गर्ल औरंगाबाद व मोबाईल नंबर टाकला होता.

5 नोव्हेंबर रोजी रात्री हा प्रकार फिर्यादीच्या लक्ष्यात आला. तसेच दुसरे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून फिर्यादी व फिर्यादीच्या घरातील लोकांची बदनामी केली. हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर फिर्यादी यांनी 7 नोव्हेंबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com