कोपरगावला सहा दिवसाआड पाणीपुरवठा

कोपरगावला सहा दिवसाआड पाणीपुरवठा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

गोदावरी डावा कालवा उपविभाग यांनी कॅनॉल दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांनी पाणी काटकसर करून वापरण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे. गोदावरी डावा तट कालवा उपविभाग कोपरगाव यांचे दि .9 नोव्हेंबर रोजीच्या पत्रानुसार अस्तीत्वात असलेला पाणी साठा दोन महिने पुरविबाबत कळविण्यात आलेले आहे.

तसेच कॅनॉल दुरुस्तीचे काम चालु करणार आहे. त्यासाठी अस्तीत्वात पाणीसाठा आवर्तन येईपर्यंत वापरणे आवश्यक असल्याने चार दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दि. 21 नोव्हेंबर पासून सहा दिवसाआड करण्यात येत आहे . याची नोंद घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यव टाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com