corona
corona
सार्वमत

वेळापुरमधील एक महीला करोना पॉझिटिव्ह

सुरेगाव संपर्कातील ८४ जणांची रॅपिड डाग्नोस्टीक किटद्वारे तपासणी

Arvind Arkhade

रांजणगाव देशमुख|वार्ताहर|Rajangav Deshmukh

११ जुलै रोजी कोपरगाव तालुक्यात सुरेगाव येथील करोना रुग्ण आढळले नंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सतरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल काल गुरुवारी प्राप्त झाला. त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या आठ जणांच्या संपर्कात आलेल्या ८४ जणांची रॅपिड डाग्नोस्टीक किटद्वारे आज शुक्रवारी तपासणी करण्यात आली. यामध्ये वेळापुर येथील ४५ वर्षीय महीला करोना पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहीती तालुका आरोग्य आधिकारी डॅा संतोष विधाते यांनी दिली आहे.

काल एकाच दिवशी सुरेगाव येथील आठ करोना बाधित निघाले. त्या संपर्कातील आज एक महीलाही पॉझिटिव्ह निघाली आहे. तालुक्यात रुग्ण संख्या हळुहळु वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

तालुक्यातील करोना बाधितांची संख्या २४ झाली असून त्यापैकी कोपरगाव शहरातील एक महिला मयत झाली आहे. काल पॉझिटिव्ह निघालेल्या आठ पैकी पाच पुरुष व तीन महिला आहेत. सात जण पहिल्या बधिताच्या कुटुंबातील आहे तर एक जण डॉक्टर आहे. प्रशासनाने सुरेगाव व वेळापुर येथे सर्वेक्षण केले असुन परिसर सिल केला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com