कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी 150 कोटी निधी हा मैलाचा दगड - कोल्हे

कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी 
150 कोटी निधी हा मैलाचा दगड - कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

साईबाबांची शिर्डी पुर्वी आपल्या मतदारसंघात होती, नंतर तिचे विभाजन होऊन नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. जगविख्यात साईबाबांचे मंदिर शिर्डी येथे त्याच्या दर्शनासाठी देश विदेशातील भाविक येतात. पण रस्त्याचे हाल प्रचंड म्हणून त्याचा पाठपुरावा मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केला आणि त्यांनी सावळीविहार कोपरगांव हद्दीतील कामासाठी 150 कोटींचा निधी दिला. हा मैलाचा दगड असून अजुनही निधी मिळविण्यांसाठी प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

कोपरगांव शहर व तालुका भाजपा तसेच मतदारसंघातील रहिवासीयांनी सौ. स्नेहलता कोल्हे यांचा जाहीर सत्कार करून केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितिन गडकरी यांचे आभार मानले त्या सत्कारास उत्तर देतांना त्या बोलत होत्या. प्रारंभी विजय आढाव यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्य साहेबराव रोहोम, माजी सभापती सुनिल देवकर, मच्छिंद्र केकाण, शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे, रवि रोहमारे, संदिप देवकर, नवनाथ आगवण, मयुर राऊत, दादा नाईकवाडे, मनिष देवकर, देविदास भिंगारे, सतिष केकाण, संतोष भिंगारे, अनुराग येवले, मनोज तुपे, अविनाश मालकर, विनोद परदेशी, बापू सुराळकर, प्रविण भासले, किशोर दरेकर, अंकुश भिंगारे, मंगेश जाधव आदि उपस्थित होते. माजी सभापती सुनिल देवकर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.