कोपरगाव शहरात चोरीचे सत्र थांबेना

कोपरगाव शहरात चोरीचे सत्र थांबेना

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरात चोरीचे सत्र वाढत चालले असून गेल्या तीन दिवसांपूर्वी शहरात एकाच वेळी दोन ठिकाणी घरफोडी तर त्याच दिवशी एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच कोपरगाव शहरातून दोन चारचाकी वाहने चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील साईनगर येथील रहिवासी किरण दत्तात्रय जाधव यांच्या घरासमोर उभी असलेली मारुती सुझुकी कंपनीची सफेद रंगाची एर्टिका नं.एम.एच.17 9660 ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद किरण जाधव यांनी दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथील जगदीश अपार्टमेंट येथील रहिवासी विश्वजीत भास्कर कोकाटे यांच्या घरासमोरून 1 लाख 20 हजार रुपये किमतीची पांढर्‍या रंगाची मारुती कंपनीची स्विफ्ट व्हीडीआय कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली. विश्वजित कोकाटे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पो.नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए . एम. दारकुंडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com