कोपरगाव तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासकराज

कोपरगाव तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासकराज

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असताना आता कुंभारी, ब्राम्हणगाव, वारी, कान्हेगाव आदी चार ग्रामपंचायतींवर प्रशासकराज आले आहे. उर्वरित जवळकेसह 13 ग्रामपंचायतींवर आगामी सप्टेंबरपर्यंत प्रशासक नियुक्ती होणार असल्याची माहिती तालुका स्तरावरून प्राप्त झाली आहे. त्यामुळे अनेक पदाधिकार्‍यांना आपल्या परतीचे वेध लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे 7675 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच घेतल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे 2-3 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित होणार्‍या ग्रामपंचायतींची माहिती निवडणूक आयोगाने मागितली आहे. या ग्रामपंचायतींच्या मुदती जशा संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तालुक्यात कालवधी पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायती- मुदत संपलेल्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येणार आहे. त्यात जवळके ग्रामपंचायत 12 फेब्रुवारी 2018-11 फेब्रुवारी 2023, कान्हेगाव 17 जानेवारी 2018-16 जानेवारी 2023, कुंभारी-23 जानेवारी 2018-22 जानेवारी 2023, घोयेगाव 20 ऑगष्ट 2018-19 ऑगष्ट 2023, ब्राम्हणगाव-दि.20 सप्टेंबर 2018-19 सप्टेंबर 2023, वारी-17 सप्टेबर 2018-16 सप्टेंबर 2023, धोत्रे-23 एप्रिल 2018-22 एप्रिल 2023, बोलकी-18 फेब्रुवारी 2018-17 फेब्रुवारी 2023, सुरेगाव-03 सप्टेंबर 2018-02 सप्टेंबर 2023, लौकी-27 जुलै 2018-26 जुलै 2023, मुर्शतपूर-10 ऑगष्ट 2018-09 ऑगष्ट 2023, चांदगव्हाण-11 ऑगष्ट 2018-10 ऑगष्ट 2023, दहिगाव बोलका-20 ऑगष्ट 2018-19 ऑगष्ट 2023, कारवाडी-20 ऑगष्ट 2018-19 ऑगष्ट 2023, पोहेगाव-23 एप्रिल 2018-22 एप्रिल 2023, शहाजापूर दि.10 ऑगष्ट 2018-09 ऑगष्ट 2023, मंजूर दि.03 सप्टेबर 2018-02 सप्टेंबर 2023 आदींचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात सदर ठिकाणी निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते कामास लागणार असल्याचे चित्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com