कोपरगावात दर रविवारी जनता कर्फ्यू

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची माहिती
कोपरगावात दर रविवारी जनता कर्फ्यू

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील सर्व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधींची बैठक नगराध्यक्ष दालनात पार पडली.करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करायच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उप मुख्याधिकारी सुनील गोर्डे उपस्थित होते.

11 जून पासून शहरातील सर्व व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू झाले आहेत.दर रविवारी 100 टक्के जनता संचारबंदी असणार आहे. रविवार वगळता फक्त हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे,विनाकारण रस्त्यावर फिरू नये-गर्दी करू नये.सर्वांनी प्रशासनास सहकार्य केले तरच आपण करोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो याचे भान ठेवणे गरजेचे आहे. प्रशासनास कठोर कारवाई करण्याची वेळ आणू नये. अत्यावश्यक सेवाही सुरू रहातील. त्याठिकाणी फक्त औषधांचीच विक्री केली पाहिजे,असाही निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com